धमकीप्रकरणी विश्‍वजित राणेंना दीड लाख रुपये भरण्याचे आदेश

0
659

अ‍ॅड. आयरीश रॉड्रिग्स यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी  आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांना मोफत कायदा सल्‍ला केंद्राकडे दीड लाख रुपये भरण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने  गुरुवारी दिले.

राणे यांच्या वतीने  गुरुवारी दुपारी ही रक्‍कम मोफत कायदा सल्‍ला केंद्राकडे भरण्यात आली. हे प्रकरण  2007 सालचे असून त्याप्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

अ‍ॅड. रॉड्रिग्स धमकीप्रकरणी   दाखल करण्यात आलेले आपल्या विरोधातील आरोपपत्र रद्द करावे, अशी मागणी करणारी याचिका   उच्च न्यायालयात राणे यांनी दाखल केली होती. त्यानंतर राणेंविरोधातील आरोपपत्र रद्द करण्यास आपली हरकत नसल्याचे म्हणत  अ‍ॅड. रॉड्रिग्स यांनी   ना हरकत दाखला न्यायालयात यापूर्वीच सादर केला आहे. त्यानुसार राणे यांच्या मागणीसंदर्भातील याचिकेवर  सुनावणी घेण्याअगोदर त्यांनी दीड लाख रुपये  इतकी रक्‍कम भरावी, असे निर्देश  न्यायालयाने गुरुवारी दिले.