सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना अटक

0
513

सरदार सरोवर धरणाची उंची कमी करण्यात यावी, या मागणीसाठी मध्य प्रदेशमधील चिकलदा गावात सुरू असलेला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांचा ‘नर्मदा सत्याग्रह’ पोलिसी बळाने चिरडण्यात आला आहे. उपोषणाला बसलेल्या मेधा पाटकर यांची प्रकृती खालावलेली असतानाही त्यांना तसेच अन्य ११ उपोषणकर्त्यांना पोलिसांनी जबरदस्ती अटक केली आहे.

शांततेच्या मार्गाने उपोषण सुरू असतानाही पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार करत मंडपही तोडल्याने  तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. नर्मदा बचाव आंदोलनाकडून मध्य प्रदेश सरकारच्या या दडपशाहीचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला आहे.