पुजारा, रहाणेची शतके; भारत भक्कम स्थितीत

0
703

श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी भारताने चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांच्या तडाखेबंद नाबाद शतकांच्या जोरावर ३ बाद ३४४ धावा केल्या आहेत. भारताचे तीन गडी १३३ धावांत माघारी परतल्यानंतर पुजारा आणि रहाणेने टिच्चून फलंदाजी करत द्विशतकी भागिदारी रचली व भारतीय डावाला आकार दिला. विराटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. शिखर धवन आणि लोकेश राहुल या जोडीने भारताच्या डावाला सुरुवात केली. मात्र संघाची धावसंख्या ५६ आणि वैयक्तिक धावसंख्या ३५ असताना शिखर माघारी परतला. त्यानंतर लोकशे राहुल अर्धशतकी खेळी करून बाद झाला. कर्णधार विराटची बॅटही चालली नाही. तो १३ धावाच करू शकला. त्यामुळे भारतीय डाव डगमगला होता. मात्र पुजारा आणि रहाणे यांनी ही पडझड थांबवत श्रीलंकेच्या गोलंदाजांची यथेच्छ धुलाई केली. आधी पुजारा आणि नंतर रहाणेनेही शतकी खेळी साकारली. दिवसअखेर पुजारा १२८ धावा करून तर रहाणे १०३ धावा करून नाबाद राहिला.