पणजी चर्च फेस्त उत्साहात साजरे

0
345
गोवा खबर:पणजी येथील मेरी ईमॅक्यूलेट कन्सेप्शन चर्चचे फेस्त आज उत्साहात साजरे झाले. सकाळी 10 वाजताची मुख्य प्रार्थना सभा पार पडल्या नंतर पारंपरिक आणि धार्मिक पद्धतीने सायबीणीची चर्च चौकातून मिरवणूक काढण्यात आली.यात चर्चचे धर्मगुरु आणि ख्रिश्चन बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
त्यानंतर दिवसभर सायबीणीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.चर्च चौकात चणे आणि खाज्याची दुकाने थाटण्यात आली आहेत.चर्चवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. गोवे येथील सेंट फ्रांसिस झेव्हियर अर्थात गोयच्या सायबाचे फेस्त झाले की 9 डिसेंबरला सर्वात पहिले पणजी चर्चचे फेस्त होते.त्यानंतर राज्यभरातील चर्चची फेस्त साजरी केली जातात.फेस्त असले की चणे, खाजे आणि छोट्या मोठ्या वस्तुंची दुकाने लागतात त्याला फेरी  असे म्हटले जाते.